ऑलिम्पिक रौप्यपदक मिळवल्यानंतर सिंधूवर बक्षिसांची खैरात

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करत नवा इतिहास रचला. 

Updated: Aug 23, 2016, 10:52 PM IST
ऑलिम्पिक रौप्यपदक मिळवल्यानंतर सिंधूवर बक्षिसांची खैरात title=

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करत नवा इतिहास रचला. 

याआधी सायनाने बॅडमिंटनमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. मात्र सिंधूने तिच्याही पुढे एक पाऊल टाकत रौप्यपदकाची कमाई केली. सिंधूंच्या या नेत्रदीपक यशानंतर तिच्या बक्षिसांची खैरात केली जातेय.

सिंधूला काय काय मिळणार आहे याचा सध्या व्हॉट्सअॅपवर मेसेज फिरतोय. 
१. आंध्र प्रदेश सरकारकडून ३ कोटी
२. तेलंगणा सरकारकडून ५ कोटी
३. दिल्ली सरकारडून २ कोटी
४. मध्य प्रदेश सरकारकडून ५० लाख
५. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनकडून ५ लाख
६. भारत पेट्रोलियमकडून ७५ लाख
७. सलमान खानकडून २५ लाख
८. बॅडमिंटन असोसिएशनकडून ५० लाख
९. मुक्काट्टू सेबास्टियन दुबईस्थित बिझनेसमनकडून ५० लाख
१०. ऑलिम्पिक असोसिएशनकडून ३० लाख
११. हरयाणा सरकारकडून ५० लाख
१२. रेल्वे मंत्रालयाकडून ५० लाख
१३. आंध्र आणि तेलंगणामध्ये २००० स्के. यार्ड जमीन
१४, तेलंगणा आणि आंध्र सरकारकडून ग्रेड १ जॉबची ऑफर
१५. २ कोटी रुपयांची बीएमडब्लू
१६. महिंद्राकडून एसयूव्ही गाडी
१७. ३-४ बिल्डरकडून सिंधू आणि तिच्या आईवडिलांना फ्लॅट
१८. एका टॉप ज्वेलर्सची सिंधू ब्रँड अॅम्बेसिडेर