भारताविरूद्ध खेळायला आम्ही घाबरणार नाही- मिसबाह

जर आम्ही वर्ल्डकप क्वॉर्टर फायनलमध्ये जिंकलो तर आमचा सामना भारताविरूद्ध होऊ शकतो. भारताविरूद्ध खेळण्याची आम्हाला कोणतीही भीती अथवा दडपण नाही, असं मत पाकिस्तानचा कॅप्टन मिसबाह उल हक यानं व्यक्त केलं आहे.

Updated: Mar 18, 2015, 11:08 AM IST
भारताविरूद्ध खेळायला आम्ही घाबरणार नाही- मिसबाह title=

कराची : जर आम्ही वर्ल्डकप क्वॉर्टर फायनलमध्ये जिंकलो तर आमचा सामना भारताविरूद्ध होऊ शकतो. भारताविरूद्ध खेळण्याची आम्हाला कोणतीही भीती अथवा दडपण नाही, असं मत पाकिस्तानचा कॅप्टन मिसबाह उल हक यानं व्यक्त केलं आहे.

भारत आणि पाकिस्तान असा सामना सेमीफायनलमध्ये झाल्यास भारताला वर्ल्डकपमध्ये पराभूत करण्याची ही नामी संधी आमच्यासाठी असणार आहे. कारण भारताला वर्ल्डकपमध्ये पराभूत करणं पाकिस्तानला आजवर शक्य झालेलं नाही, असं मिसबाहनं सांगितलं. 

पाकिस्तानचा क्वॉर्टर फायनलमधील सामना ऑस्ट्रेलिया विरूध्द आहे. हा सामना जिंकण्याचा आत्मविश्वास मिसबाहनं व्यक्त केला आहे. तसंच मोहम्मद इरफानचं  वर्ल्ड कपमधून बाहेर होणं हा आमच्यासाठी मोठा झटका आहे तरीही आम्ही चांगली कामगिरी करू. तसंच आम्ही वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आहे. त्यामुळं आम्ही ऑस्ट्रेलियालाही पराभूत करू शकतो, असा आत्मविश्वास मिसबाहला आहे.

भारत वर्ल्डकपमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करत आहे. तसंच ते वर्ल्ड कपचे गतविजेते विजेते असल्यानं आत्मविश्वासानं खेळत आहेत. याशिवाय गेल्या तीन महिन्यांपासून भारत ऑस्ट्रेलियात आहे याचाही फायदा भारताला होत असल्याचं मिसबाहनं सांगितलं.