OMG Facts : एका चेंडूत बनविले २८६ रन्स, अजून आबाधित रेकॉर्ड

संपूर्ण संघ ३ रन्सवर बाद झाला, एका चेंडूत सात रन्स घेतले, एका ओव्हरमध्ये ३६ रन्स, एका चेंडूत २० धावा असे आधुनिक युगातील क्रिकेटच्या रेकॉर्डचे आपण साक्षीदार आहोत. पण एका चेंडूत २८६ रन्स काढण्याचे रेकॉर्डबद्दल तुम्हांला सांगितले तर तुम्हांला विश्वास बसणार नाही. पण असे रेकॉर्ड झाले आहे पण त्याला अधिकृत मान्यता किंवा पुरावा उपलब्ध नाही आहे. 

Updated: Jul 26, 2015, 06:46 PM IST
OMG Facts : एका चेंडूत बनविले २८६ रन्स, अजून आबाधित रेकॉर्ड title=

मुंबई : संपूर्ण संघ ३ रन्सवर बाद झाला, एका चेंडूत सात रन्स घेतले, एका ओव्हरमध्ये ३६ रन्स, एका चेंडूत २० धावा असे आधुनिक युगातील क्रिकेटच्या रेकॉर्डचे आपण साक्षीदार आहोत. पण एका चेंडूत २८६ रन्स काढण्याचे रेकॉर्डबद्दल तुम्हांला सांगितले तर तुम्हांला विश्वास बसणार नाही. पण असे रेकॉर्ड झाले आहे पण त्याला अधिकृत मान्यता किंवा पुरावा उपलब्ध नाही आहे. 

असे बनले एका चेंडूत २८६ रन्स

ऑस्ट्रेलियातील एका सामन्यात व्हिक्टोरिया आणि त्यांच्या शेजारच्या टीम स्क्रॅच इलेवनमध्ये मॅच होती. व्हिक्टोरियाची प्रथम फलंदाजी होती. त्यावेळी व्हिक्टोरियाच्या पहिल्या फलंदाजाने पहिलाच चेंडू इतका जोरात मारला की तो मैदानात असलेल्या एका झाडाच्या फांदीवर जाऊ अडकून बसला. 

फांदीवर चेंडू अडकून बसल्यावर चेंडू हरवला म्हणून घोषीत करणे अपेक्षित होते. पण तो चेंडू दिसत होता, त्यामुळे चेंडू हरवला असे अंपायरने घोषीत केले नाही. त्यामुळे फलंदाजांनी धावून २८६ रन्स काढले. हा सामना १८९३-९४ मध्ये खेळविण्यात आला होता. 

चेंड़ू काढण्यासाठी मागवली रायफल
रन्स काढण्यासाठी धावणाऱ्या फलंदाजांना थांबविण्यासाठी प्रतिस्पर्धी संघांनी अंपायरला सांगितले. पण चेंडू दिसत असल्याने त्याने ही मागणी फेटाळली. अंपायरने चेंडू काढण्यासाठी झाड कापण्यास सांगितले तरीही चेंडू खाली पडत नव्हता. सर्व प्रयत्न बेकार गेले. मग शेवटी चेंडू काढण्यासाठी रायफल मागविण्यात आली. त्यानंतर चेंडू खाली पडला. पण तो पर्यंत व्हिक्टोरियाच्या फलंदाजांनी २८६ धावा काढल्या होत्या. 
   
कॅच पकडू शकला नाही
मजेदार गोष्ट अशी की चेंडू झाडावरून खाली पडला तेव्हा कोणताही खेळाडू तो कॅच पकडू शकला नाही. यानंतर व्हिक्टोरियाने आपला डाव घोषीत केला. प्रतिस्पर्धी संघ खेळाला उतरला तेव्हा एका चेंडूत २८६ धावा करू शकला नाही म्हणून सामना गमावला. या २८६ रन्ससाठी दोन्ही फलंदाजींनी पिचवर सुमारे ६ हजार मीटर म्हणजे ६ किलोमीटर धावले होते. 
   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.