कुशल टंडनला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलीच चुरस रंगली आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच सीझनमध्ये सहभागी झालेला अभिनेता कुशल टंडन हा बुधवारी सकाळी बीग बॉसच्या घरातून बाहेर पडला.

Updated: Dec 18, 2013, 09:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलीच चुरस रंगली आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच सीझनमध्ये सहभागी झालेला अभिनेता कुशल टंडन हा बुधवारी सकाळी बीग बॉसच्या घरातून बाहेर पडला.
या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यासाठी गौहर खान आणि एजाज खान बरोबर कुशलच ही नाव घेण्यात आला होत. त्यामुळे कुशलच बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण हे सर्वांना आचर्यकारक वाटत आहे.
२८ वर्षीय कुशल हा याअधी त्याचा प्रतिस्पर्धी विजय अँडीबरोबर केलेला आक्रमक व्यवहार आणि दुर्व्यवहारमुळे त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर तो २१ नोव्हेंबरला परत घरात आला होता. या आठवड्यात शनिवारी दाखवण्यात येणाऱ्या शोमध्ये अजून एक स्पर्धक घराच्या बाहेर काढण्यात येणार आहे. या शोचे यजमान पद हे सलमान खानकडे आहे.
सूत्राच्या माहितीनुसार कुशला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढल्यानंतर आता परत बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यासाठी नामांकन करण्यात आले आहे. या नामांकनातून एकाला शनिवारी घरातून बाहेर जावे लागणार आहे. ‘बिग बॉस सीझन ७’ हे १५ सप्टेंबरपासून प्रसारित करण्यात आले होते. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील १४ व्यक्ती समाविष्ट करण्यात आल्या होत्या. यामधून बिग बॉसमध्ये आता पर्यंत राहीलेल्या व्यक्तींमध्ये गौहर, एजाज, संग्राम सिंग, अँडी, अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी यामध्ये आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.