www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडलेल्या सोफियानं अरमानची पोलिसांत तक्रार केल्यानंतर अरमानला एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढावी लागली. याबद्दल घरातल्या इतर स्पर्धकांना याची कल्पना नव्हती. पण, यावेळी अरमानला मदत करण्यासाठी सर्वात आधी पुढे सरसावला तो ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खान...
ब्रिटिश गायिका – अभिनेत्री सोफिया हयात हिनं शो दरम्यान अरमाननं तिच्यावर कथित स्वरुपात हल्ला करण्याची तक्रार पोलिसांमध्य दाखल केली होती. यानंतर, काल लोणावळा पोलिसांनी ‘अरमान’ला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढून अटक केली. पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी केली गेली. सध्या पोलीस या प्रकरणात बीग बॉसच्या घरातील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, अरमानला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजताच सलमान खाननं तात्काळ अरमानशी संपर्क साधला... आणि त्याला धीर दिला.
अचानक कोसळलेल्या या संकटानं अरमान चांगलाच तापला होता. सलमाननं त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. सोफियानं नोंदवलेल्या तक्रारीवर कायदेशीर पद्धतीनंच जाण्याचा सल्ला त्यानं अरमानला दिला. एवढंच नाही तर, तू लवकरच बिग बॉसच्या घरात परतशील, असं म्हणत सलमाननं अरमानला शांत केलं.
दुसरीकडे, अरमानची गर्लफ्रेंड तनिषाला अरमानच्या अटकेची बातमी समजल्यानंतर तिला अश्रू आवरण कठिण झालं. तसंच चॅनलनंही कायदेशीर धोका टाळण्यासाठी अरमानची अटक नॅशनल टेलिव्हिजनवर दाखवण्याचं टाळलं. पण, या घटनेमुळे सलमानच्या मनात अरमानसाठी एक खास कोपरा असल्याचं उघड केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.