मराठा आरक्षणला राज ठाकरेंचा विरोध...

मतांच्या राजकारणासाठीच राज्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाचे खूळ निर्माण केलं जात असल्याची टिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 6, 2013, 04:32 PM IST

www.24taas.com, नंदूरबार
मतांच्या राजकारणासाठीच राज्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाचे खूळ निर्माण केलं जात असल्याची टिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. राज्यात नोकर्या च नसताना त्यासाठी आरक्षण मागण्याचा अट्टाहास का? असा सवाल करत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या मराठा आरक्षणाला विरोध दर्शवलाय.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्राचा झंझावती दौरा सुरु आहे. या दौर्यायतील अंतिम टप्पा असलेल्या उत्तर महाराष्ट्रात सध्या राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मतं जाणून घेत आहेत. गुरुवारी नंदूरबार जिल्ह्याच्या दौर्या वर आलेल्या राज ठाकरेंनी जिल्हयातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. पक्षस्थापनेनंतर राज जिल्ह्यात दाखल झाले होते.
ठाकरेंनी औपचारिकपणे पत्रकार परिषद न घेता जिल्हयातील समस्या आणि पक्षाची स्थिती जाणून घेण्यासाठी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांना मराठा आरक्षणाबाबत विचारले असता ते म्हणाले, राज्यकर्ते मतांच्या राजकारणासाठीच मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत असून यामुळे समाजात फूट पाडत असल्याचा आरोप राज यांनी केलाय. ‘मराठा आरक्षणासाठी नोकरीचं कारण पुढे केलं जातंय. मात्र, राज्य सरकार नोकर्या देण्यात अपयशी ठरत असताना आणि राज्यात नोकर्या च नसताना आरक्षणाच्या मागणीमागे काय गौडबंगाल आहे, हे वेगळे सांगायला नको’ असं म्हणत त्यांनी मराठा आरक्षाला आपला विरोद दर्शवला.

‘मी दुष्काळी दौऱ्यावर नव्हे तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी राज्यभर फिरत आहे. नंदूरबार जिल्हया काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, धारदार विरोधक नाही… म्हणून दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आयात करण्यापेक्षा आपल्या पक्षातीलच कार्यकर्ते आणि पदाधिकार्यां मधूनच सक्षम पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत... यापुढे समर्थ पर्याय म्हणून मनसे पक्षाकडे पाहा’ असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मोदींची वाहवा करतानाच ‘गुजरातनं महाराष्ट्राच्या वाटयाचं पाणी आणि वीज देवू केली असतानाही राज्य शासन त्याचा फायदा उचलण्यात अपयशी ठरलंय’ अशी टीकाही त्यांनी यावेळी केलीय.

नंदूरबारमधला ठेचा न्यारा
शिवसेनेत असतांना नंदूरबार भेटही यावेळी राज ठाकरेंच्या स्मरणार होती. नंदूरबारच्या आदिवासीपाडयात त्यावेळी खाल्लेला ठेचा अन् भाकरीचा स्वाद अजूनही आपल्या जिभेवर असल्याचं त्यांनी म्हटलंय.