`झी मीडिया`चा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

झी मीडियाच्या `माय अर्थ माय ड्युटी` या मोहिमेअंतर्गत नुकताच पुण्यात एक कार्यक्रम पार पडला. या मोहिमेचं हे चौथं वर्ष आहे. देशभरात लाखो झाडं लावून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प या निमित्तानं कऱण्यात आलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 13, 2013, 05:13 PM IST

www.24taas.com, पुणे
झी मीडियाच्या `माय अर्थ माय ड्युटी` या मोहिमेअंतर्गत नुकताच पुण्यात एक कार्यक्रम पार पडला. या मोहिमेचं हे चौथं वर्ष आहे. देशभरात लाखो झाडं लावून पर्यावरणसंवर्धनाचा संकल्प या निमित्तानं कऱण्यात आलाय.
`झी मिडिया`नं २०१० मध्ये "माय अर्थ माय ड्युटी" या कॅम्पेनची सुरवात केली. या मोहिमेअंतर्गत पुण्यातल्या एनडीएमध्ये नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पुण्यातल्या आर्मी पब्लिक स्कूलच्या ५०० विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली..

पुण्यातल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाटकाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला. गेल्या ३ वर्षांपासून "माय अर्थ माय ड्यूटी" या मोहिमे अंतर्गत झी मिडिया पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावतंय.
२०१०-११ मध्ये तब्बल १ लाख गावं आणि ३४ हजार शहरांमधून ७४ लाख झाडांची लागवड करण्यात आली. या मोहिमेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झालीय.. देशाला हिरवंगार करण्याचा हा वसा असाच पुढेही सुरू राहणर आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.