www.24taas.com , झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूरच्या टोलविरोधी कृती समितीला हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. आता यासंदर्भातली सुनावणी २८ ऑक्टोबरपर्यंत सुरूच राहणारेय. त्यामुळं शहरात टोल वसुली सुरूच राहणार.
दरम्यान उद्या टोल विरोधी कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणारेय. या निकालाआधी आज शिवसेनेच्या वतीनं कोल्हापुरातल्या शिये नाक्यावर मानवी साखळी करुन आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर जाणाऱ्या वाहन चालकांना टोल भरु नये असं आवाहन केलं.
या दरम्यान पोलिसांनी शिवसैनिकांना अटक करण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी आम्ही कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाही. मग आमच्यावर का कारवाई असा जाब विचारलाय. त्यावेळी पोलिसांनी माघार घेतली. टोल नाक्यावर आय.आर.बी कंपनीच्यावतीनं व्हिडीओ शुटिंग करण्यासाठी उभा असलेल्या कर्मचाऱ्याला शिवसैनिकांनी धारेवर धरुन त्याला हुसकावून लावलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.