करा छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन...

राजा शिवछत्रपती म्हणजेच `जाणता राजा` अशी... महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय जयंती आज साजरी करण्यात येते आहे.

Updated: Feb 19, 2013, 01:31 PM IST

www.24taas.com, पुणे
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।
राजा शिवछत्रपती म्हणजेच `जाणता राजा` अशी... महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय जयंती आज साजरी करण्यात येते आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज उत्साहात महाराजांची जयंती साजरी करण्यात येतेय. ‘झी २४ तास’कडूनही महाराजांना मानाचा मुजरा....
पुण्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली... लाल महाल इथून भव्य मिरवणूक काढण्यात आली... कोल्हापुरचे छत्रपती संभाजीमहाराज यांच्या हस्ते शिवप्रतिमेला अभिवादन करून मिरवणुकीला सुरवात झाली. या मिरवणुकीत साहसी खेळांचं चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. शिवाय आकर्षक चित्ररथही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
`झी २४ तास`कडून छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन... आपणही करू शकता महाराजांना मानाचा मुजरा... खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या भावना... छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करूया...