www.24taas.com, झी मीडिया, चंदिगड
एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेणारा बॉलिवूड स्टार मुन्नाभाई अर्थात संजय दत्त सध्या येरवडा तुरुंगात वर्तमानपत्रापासून कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण घेत आहे. तीन महिन्याचं हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दिवसाचे त्याला पंचवीस रुपये मानधन मिळणार आहे. विशेष म्हणजे या पिशव्या मुंबईतील मोठमोठ्या शॉपिंग मॉल मधील दुकानात जाणार आहेत. या ठिकाणी कधी काळी संजय दत्तने लाखो रुपयांची खरेदी केली असणार आहे.
मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी पुण्याच्या येरवडा तुरुंगात करण्यात आली. या तुरुंगात शिक्षा झालेल्या कैद्यांना विविध काम दिली जातात. त्याबाबतच प्रशिक्षण या कैद्यांना दिल जात. त्यात बागकाम, सुतारकाम आधींचा समावेश असतो. तसेच याठिकाणी एक पेपर फॅक्टरी आहे, यात कागदापासून विविध वस्तू बनवल्या जातात तिथे सध्या कागदी पिशव्या तयार केल्या जातात.
सध्याही मुंबईतीलच एका बुटीकच्या साडेचार हजार पिशव्या तयार करण्याचे काम या तुरुंगातील फॅक्टरीला मिळालं आहे, या पिशव्या तयार करण्याचं प्रशिक्षण येथे कैद्यांना सामाजिक संस्थाच्या कार्यकत्यांच्या माध्यमातून दिलं जाते. हे कार्यकते दोन ते तीन वेळा येवून या लोकांना अशा प्रकारच्या पिशव्या तयार करण्याच प्रशिक्षण देतात.
प्रशिक्षण घेतल्यावर कैदी स्वतः तुरुंगात या पिशव्या तयार करण्याचा सराव करतात. या कामात पारंगत झाल्यावर तुरुंगातील कागदाच्या फॅक्टरीत काम दिल जाते. या कामासाठी कैद्याला दिवसाला पंचवीस रुपये दिले जातात.
सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, अशाच प्रकारच्या कागदी पिशव्या बनविण्याच प्रशिक्षण सध्या बॉलीवूड स्टार संजय दत्त येरवडा तुरुंगात घेत आहे. सध्या तो सकाळी पावणे आठ ते सायंकाळी साडेचार या वेळेत वर्तमानपत्रापासून पिशव्या तयार करण्याचा सराव करीत आहे, पुढील दोन महिने तो असाच या पिशव्या तयार करण्याचा सराव करणार आहे. त्यानंतर काम जमू लागल्यावर त्याला तुरुंगातील फॅक्टरीत काम दिल जाणार आहे तिथे त्याला दिवसाचे पंचवीस रुपये मानधन मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.