www.24taas.com, झी मीडिया, पुणे
२८वी ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ आज पार पडली. अपेक्षेप्रमाणे यावर्षी देखील पुणे मॅरेथॉनवर अफ्रिकन धावपटूंचं वर्चस्व राहिलं.
इथियोपियाच्या बेलाचु एंडेले अबानेह याने ४२ किलोमिटरची मुख्य मॅरेथॉन जिंगलीये. त्याने दोन तास १७ मिनिटे ४८ सेकंदात हे अंतर पार केलं. केनियाचा झेकीयल चेरोफ हा दुसरा तर इथियोपियाचा एडीसा मेर्गा वीझेयु तिस-या क्रमांकावर राहिला. तसंच हाफ मॅरेथॉनमध्ये ही इथियोपियाच्या हबतामु अर्गाबेगी याने बाजी मारलीय.
४२ किलोमीटरच्या मुख्य मॅरेथॉनबरोबरच हाफ मॅरेथॉन आणि इतर अनेक गटांत ही मॅरेथॉन स्पर्धा विभागली गेली होती. अपंगांसाठीदेखील विशेष मॅरेथॉन आयोजित केली जाते. ४२ किलोमीटरच्या मुख्य मॅराथॉनला सकाळीच सुरूवात झाली.
खंडुजी बाबा चौकातून या स्पर्धेला प्रारंभ झाला. ‘रन फॉर मदर’ ही यावर्षीच्या या मॅरेथॉन स्पर्धेची थीम आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.