www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर
पंढरपूर मदिर समितीनं आषाढीला येणा-या लाखो वारक-यांचा विचार न करता व्हीआयपींच्या दर्शनाची सोय करत असल्याचं उघड झालंय. राज्यातल्या कुठल्याही देवस्थान समितीनं महत्वाच्या सणांच्या दिवशी आणि इतर महत्वाच्या दिवशी व्हीआयपी पासेस देऊ नये असं स्पष्ट आदेश राज्यपालांनी दिलेले असतानाही मंदिर समिती प्रशासनानं आदेश धाब्यावर बसवलेत.
लाखो वारकरी आपली तहानभूक विसरुन लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. अशा भाविकांच्या दर्शनासाठी राज्यपालांच्या आदेशानं देवस्थानांच्या समित्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्यात. त्यात महत्त्वाच्या दिवशी कुठल्याही मार्गानं व्हीआयपी दर्शन देऊ नये असे स्पष्ट आदेश देण्यात आलेत. मात्र राज्यपालांचे आदेश पंढरपूरच्या मंदिर समिती प्रशासनानं धाब्यावर बसवलेत.
तसंच मंदिर प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळं मुख्यमंत्र्यांच्या कमी वेळेत दर्शन अशा घोषणेला काही महत्त्व दिलेलं दिसत नाहीय. कारण व्हीआयपींना दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली जाणारेय. मात्र लाखो वारक-यांचा विचार करून मंदिर प्रशासन आपला विचार बदलेल का असा प्रश्न आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.