www.24taas.com, सातारा
शारदाबाई आश्रम शाळेचे कार्याध्यक्ष उपराकार लक्ष्मण माने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर आणखी दोन महिलांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याआधी त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल झाले होते. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू असून लक्ष्मण माने यांच्या शोधार्थ कोल्हापूर, सातारा आणि पुणे इथं पथकं रवाना करण्यात आली आहे.
`उपरा` या गाजलेल्या कादंबरीचे लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कायमस्वरूपी स्वयंपाकीण म्हणून घेतो असे सांगून वारंवार बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तीन महिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटल आहे की, २००३ पासून जकातवाडी येथेली भारतीय भटके व विमुक्त विकास व संशोधन संस्था संचलित शारदाबाई पवार आश्रमशाळेत आम्ही स्वयंपाकीण आहोत. या आश्रमशाळेत आम्ही तात्पुरत्या पदावर रूजू झालो. त्यानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष माने यांनी स्वयंपाकीण म्हणून कायमस्वरूपी कामावर घेण्याचे आमिष दाखवून आमच्यावर वारंवार बलात्कार केला.