www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपने मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवलाय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं असं तावडे म्हणाले.
फक्त निवडणुका जवळ आल्या की राष्ट्रवादी काँग्रेसला मराठा आरक्षणाची आठवण येते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका घेत आहे. अशा शब्दात तावडेंनी राष्ट्रवादीवर टीका केली.
कित्येक निवडणुका आल्या आणि गेल्या, मात्र मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर ना कुठलं ठोस उत्तर मिळालंय, ना कुठला राजकीय पक्ष याच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय. वर्षानुवर्षं हा प्रश्न प्रलंबित आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आता या प्रलंबित मुद्द्यावर वेगळीच भूमिका घेत विषयाचा रोख वेगळ्याच दिशेला वळवला. सर्वच जातीतल्या मागासांना आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची भूमिका पवारांनी मांडली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.