निवडणूक आयोगाची 'कोटीच्या कोटी उड्डाणे'

महापालिका उमेदवारांना खर्चाची मर्यादा होती चार लाख तर निवडणूक आयोगानं एका प्रभागासाठी खर्च केले ८ लाख ५५ हजार. आयोगाची एका प्रभागासाठी खर्चाची मर्यादा होती १८ लाख. प्रचाराला खर्चाची मर्यादा कमी मात्र आयोगाला निवडणूक घेण्यासाठी खर्च जास्त असा हा विरोधाभास पुढं आला आहे.

Updated: Feb 23, 2012, 08:01 AM IST

www.24taas.com, पुणे

महापालिका उमेदवारांना खर्चाची मर्यादा होती चार लाख तर निवडणूक आयोगानं एका प्रभागासाठी खर्च केले ८ लाख ५५ हजार. आयोगाची एका प्रभागासाठी खर्चाची मर्यादा होती १८ लाख. प्रचाराला खर्चाची मर्यादा कमी मात्र आयोगाला निवडणूक घेण्यासाठी खर्च जास्त असा हा विरोधाभास पुढं आला आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाला आतापर्यंत ६ कोटी ५० लाख रुपये खर्च आला आहे. या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात ७६ प्रभाग आहेत. एका प्रभागासाठी सुमारे ८ लाख ५५ हजार इतका खर्च आला आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी एका प्रभागाला १२ लाख ७६ हजारांची मर्यादा आहे. निवडणुकीसाठी आयोग जवळपास १३ लाखांची तरतुद करतं. मात्र उमेदवाराला खर्चाची मर्यादा होती चार लाख ४० हजार. मोठा प्रभाग, मतदार संख्याही मोठी यामुळं या खर्चात प्रचार करणं उमेदवारांसाठी जिकीरीचं होतं.

निवडणूक यंत्रणेसाठी एका मतदारामागं ३८ रुपये खर्चाची मान्यता निवडणूक आयोगानं दिली होती. पुण्यात २५ लाख ५८ हजार मतदार पाहता ९ कोटी ७० लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत साडे सहा कोटी रुपये खर्च झाला आहे. हाही जास्त असल्याचं अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. वाढलेली मतदान केंद्र त्यामुळं वाढते कर्मचारी, वाहने यामुळं हा खर्च वाढला आहे. यातली आणखी आश्चर्याची बाब म्हणजे हा खर्च आयोगानं नाही तर पुणे महापालिकेनं केला आहे.