www.24taas.com, पुणे
पुण्यातल्या ‘सिंहगड इन्स्टिट्युट'च्या नवलेंचा आणखी एक प्रताप केला आहे. नवलेंनी आता पवन गांधी ट्रस्टच्या चैनसुख गांधींविरोधातच याचिका दाखल केली आहे. चैनसुख गांधींनीच एका शेतकऱ्याची जमीन हडपल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण त्यासाठी सादर केलेला पुरावा बनावट असल्याचं स्पष्ट झालं आहे आणि नवले पुन्हा एकदा खोटे ठरले आहेत.
मारुती नवलेंना सुप्रीम कोर्टानं दणका देऊनही त्यांची बनवाबनवी थांबलेली नाही. ‘पवन गांधी ट्रस्ट’ची साडे अकरा एकर जमीन ‘सिंहगड इन्स्टिट्युट”च्या मारुती नवलेंनी बळकावली. तरीही नवलेंनी आता चैनसुख गांधींविरोधातच याचिका दाखल केली. चैनसुख गांधींनीच ही जमीन एका शेतकऱ्याकडून हडपल्याचं या याचिकेत म्हंटलं आहे. पुरावा म्हणून त्यांनी मावळच्या प्रांताधिकाऱ्यांची प्रत जोडली. पण ही प्रत बनावट असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नवलेंनी हायकोर्टात दाखल केलेल्या या याचिकेवर २४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यात नवलेंच्या बनवाबनवीचा आणखी एक नमुना सादर होणार आहे. पवन गांधी ट्रस्टची जमीन हडप करताना नवलेंनी आतापर्यंत केलेल्या बनवाबनवींची गणती करणंही अवघड झालं आहे. एक खोटं लपवायला दुसरं खोटं असं करत नवलेंनी खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. आता नवले थेट गांधींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत. याचे परिणाम नवलेंना लवकरच भोगावे लागणार आहेत.