www.24taas.com, मुंबई
भारताला मार्च २०१२मध्ये कबड्डीचा विश्वचषक मिळवून देणाऱ्या तिन मराठी कन्यांना तब्बल १३ वर्षांनंतर त्यांचे जाहीर झालेले १ कोटी रूपयांचे बक्षिस मिळाले आहे. यासाठी झी २४ तासने पाठपुरावा केला. तेव्हा कुठे त्यांची बक्षिसाचे रक्कम हातात पडली.
कबड्डीपटू सुवर्णा बारटक्के, दीपिका जोसेफ आणि अभिलाषा म्हात्रे या तिघींनी विश्वचषक जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या या कामगिरीची दखल एक कोटींचं इनाम बहाल करण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात इनाम हातात पडण्यासाठी सुवर्णा, दीपिका आणि अभिलाषाला तब्बल तेरा महिने वाट पाहावी लागली.
सुवर्णा, दीपिका आणि अभिलाषा यांच्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र सरकारच्यावतीने प्रत्येकी एक कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा मुख्यमंत्री विसरले होते. झी २४ तासने याचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांना त्यांचे बक्षिस मिळाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा त्याग करून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली, त्याच दिवशी महाराष्ट्र शासनाच्यावतीने तीन कबड्डी खेळाडूंना एक कोटी प्रदान करण्यात आलेत.