www.24taas.com, मेलबर्न
सर्बियाच्या अव्वल सीडेड नोव्हाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. त्यानं ब्रिटनच्या अँडी मरेवर ६-७, ७-६, ६-३, ६-२ नं मात केली. जोकोविचनं सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताब जिंकत एक इतिहासच रचलाय.
रंगतदार लढतीमध्ये जोकोविचनं पहिला सेट गमावल्यानंतर जोरदार कमबॅक केला. त्यानं सलग तीन सेट जिंकत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या विजेतेपदासह जोकोविचनं सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याची किमया साधलीय. अशी कामगिरी करणारा तो एकमेव टेनिसपटू ठरला आहे.
जोकोविचनं सलग २०११, २०१२ आणि २०१३ अशी सलग तीन वर्ष ऑस्ट्रेलियन ओपनवर आपला दबदबा राखला. जोकोविचच्या धडाक्यापुढे अॅन्डी मरेचं काहीच चाललं नाही आणि त्याला उपविजेतेपदावर समाधाना मानाव लागलं.