www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
येत्या 12 जूनपासून ब्राझीलमध्ये फिफा वर्ल्डकप 2014 ला सुरुवात होतेय. भारतीय फुटबॉल टीमही या वर्ल्डकपमध्ये सहभागी झालीय. मात्र भारतानं एकदा फुटबॉल वर्ल्ड कप जिंकला होता. यावर आपला विश्वा स बसत नाही ना. पण, हे खरं आहे. मात्र, तो वर्ल्ड कप अनाथ मुलांचा होता. त्यात भारतानं टांझानियाचा १-० गोल फरकानं पराभव करत जगज्जेतेपदाचा वर्ल्ड कप जिंकला होता.
दरबानमध्ये झालेल्या अनाथ मुलांच्या या वर्ल्ड कपमध्ये आठ देशांतील टीम सहभागी झाल्या होत्या. बाल कल्याणसाठी काम करणार्याथ काही संस्थांनी भारतातील अनाथ मुलांना दक्षिण आफ्रिकेच्या टूरवर नेलं होतं. याच मुलांनी मग अनाथांच्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
या स्पर्धेत भारतासह ब्राझील, इंग्लंड, निकारागुआ, फिलीपीन्स, यजमान दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि युक्रेन हे देश सहभागी झाले होते. किताबी लढतीपूर्वी हिंदुस्थानी संघातील मुलांनी आम्ही हा वर्ल्ड कप केवळ आमच्या देशासाठीच नाही तर जगभरातील अनाथ मुलांसाठी जिंकणार आहोत, असं म्हटलं होतं. शेवटी त्यांनी जिंकलेला वर्ल्ड कप जगातील अनाथ मुलांना समर्पित केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.