भूपती-बोपन्नावर दोन वर्षांची बंदी

महेश भूपती आणि रोहन बोपन्ना या भारतीय टेनिस जोडीवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय ‘ऑल इंडिया टेनिस असोसिएशन’नं घेतला आहे. जो पर्यंत भारत डेव्हिस कपच्या एशिया ओशियाना ग्रुपमध्ये दाखल होत नाहीत, तोपर्यंत या दोघांना टीममध्ये संधी देण्यात येणार नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 16, 2012, 08:40 PM IST

www.24taas.com, मुंबई
महेश भूपती आणि रोहन बोपन्ना या भारतीय टेनिस जोडीवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय ‘ऑल इंडिया टेनिस असोसिएशन’नं घेतला आहे. जो पर्यंत भारत डेव्हिस कपच्या एशिया ओशियाना ग्रुपमध्ये दाखल होत नाहीत, तोपर्यंत या दोघांना टीममध्ये संधी देण्यात येणार नाही.
युवा टेनिसपटूंनी अविस्मरणीय कामगिरी केल्यानंच एआयटीएनं हा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या डेव्हिस कप मॅचेसमध्ये युवा टेनिसपटूंनी भारताला 3-0 नं विजयी आघाडी मिळवून दिली. दरम्यान, लिएंडर पेसच्या नावाचा विचार एशिया ओशियाना लढतीसाठी करण्यात येणार की, नाही हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, लंडन ऑलिम्पिकबरोबर पेसबरोबर खेळण्यास नकार दिल्यानचं एआयटीएनं हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय.