नाशिक : ख्यातनाम गायक सुरेश वाडकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिकच्या न्यायालयाने दिलेत.
नाशिक भूखंड खरेदी प्रकरणी हा आदेश देण्यात आलाय. परस्परविरोधी वादातून हा खटला सुरु झाला होता.
सुरेश वाडकर यांनी गायक सोनू निगम, महेश कोठी कर यांच्यासह नाशिकमध्ये एक भूखंड खरेदी केला होता.
मात्र या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचा आरोप महेश कोठीकर यांनी वाडकर यांच्यावर केला होता. त्यावेळी वाडकर यांनीही न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र या प्रकरणी सुरेश वाडकर यांना दिलासा न मिळता उलट त्यांच्याच विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाकडून आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.