www.24taas.com, नाशिक
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे. पल्लवी गोसावी असं आत्महत्या करणा-या विवाहितेच नाव आहे. नऊ वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं. लग्नानंतर मुलबाळ होत नसल्यानं सासरच्यांकडून तिचा छळ होत होता.
सिडको एन-५ मधील साने गुरुजी कॉलनीतील पल्लवी समाधान गोसावी (२९) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मूल होत नसल्याने सासरच्या मंडळींनी छळ केल्यामुळे तिने जीवनयात्रा संपवल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. नऊ वर्षांपूर्वी पल्लवीचे समाधानशी लग्न झाले होते.
मूल होत नसल्याने तसेच हुंड्यासाठी सासरच्या मंडळीने त्यांचा छळ केल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पतीला अटक केली. दरम्यान, आत्महत्येनंतर घराजवळ शंभर ते दीडशे लोकांचा जमाव जमला होता. पल्लवीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर काही अंशी तणाव निवळला.