www.24taas.com, झी मीडिया, लासलगाव
एका महिन्यात जमिनीवर असलेले कांद्याचे दर आकाशाला भिडविना-या व्यापा-यांवर आयकर विभागानं आज धाडी टाकल्या. आयकर विभागाच्या अंदाजे पंधरा ते वीस अधिका-यांनी लासलगावात ओमप्रकाश रतनलाल राका व ब्रम्हेचा फर्म या कांदा व्यापा-यांकडे दिवसभर कसून चौकशी केली.
तसंच नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा उमराणे आणि लासलगाव परिसरातल्या मुख्य व्यापा-यांवर आयकर विभागानं लक्ष केंद्रित केलंय. हे व्यापारी आधीपासूनच आयकर विभागाच्या रडारवर होते. मात्र कांद्याचे भाव गगनाला भिडले असताना ही कारवाई झाली असती, तर त्याचा विपरित परिणाम झाला असता. कदाचित कांद्याची आणखी टंचाई निर्माण होण्याचा धोका होता. त्यामुळेच आता दर खाली आल्यानंतर आयकर खात्यानं कारवाईचा बडगा उगारलाय.
शेतकऱ्यांच्या आडून सर्वसामान्यांवर दरवाढ लादत स्वतःच उखळ पांढरं करणा-या आणि सरकारला अडचणीत आणणा-या व्यापा-यांना या कारवाईमुळे रजब बसेल, अशी अपेक्षा आहे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.