www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला आपट्यांच्या पानाला मोठा मान असतो. आपट्याची पानं एकमेकांना देऊन दसऱ्याचा आनंद द्विगुणीत केला जातो. आता या पानांची जागाही सोन्याच्या पानांनी घेतली आहे.
जळगावातल्या सराफ बाजारात अर्ध्या ग्रॅमपासून ते दोन ग्रॅमपर्यंत वेगवेगळ्या डिझाईनची सोन्याची पान खरेदीसाठी उपलब्ध आहेत. पितृपक्षात थांबलेली खरेदी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आश्विन शुद्ध दशमीला म्हणजेच विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सुरु होते. या दिवसात केलेली खरेदी धनसंचयाचा आंनद देणारी असते त्यामुळे या दिवसात सोने खरेदीसाठी सराफ बाजाराला वेगळी झळाळी निर्माण होते. बाजारात पारंपारिक दागिन्यांच्या खरेदीसह सोन्याच्या पानांना मागणी वाढलीय.
सध्या सराफ बाजारात मंदी असल्याचा दावा सराफ करत आहेत. मात्र दसरा संपला तरी दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीला प्रतिसाद मिळेल असेही सराफांचं म्हणणं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.