केजरीवाल सत्तेची जबाबादारी घेण्यापासून पळतायेत - पवार

दिल्लीत आम आदमी पार्टीला यश मिळाले असले तरी त्यांना सत्तेची जबाबदारी नको आहे. अरविंद केजरीवाल आता सत्तेची जबाबादारी घेण्यापासून का पळतायत? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केजरीवालांची टर उडवलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 12, 2013, 08:12 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
दिल्लीत आम आदमी पार्टीला यश मिळाले असले तरी त्यांना सत्तेची जबाबदारी नको आहे. अरविंद केजरीवाल आता सत्तेची जबाबादारी घेण्यापासून का पळतायत? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केजरीवालांची टर उडवलीय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत वीजेचे दर, भाज्यांचे दर झाडू घेऊन निम्म्यावर आणण्याचा दावा करणारे केजरीवाल यांना आता सत्तेची जबाबादारी नको आहे. त्यामुळे सरकार स्थापन न करता विरोधात बसण्याचा निर्णय घेतात, हे योग्य नाही. त्यांनी जबाबदारी घेऊन केलेल्या घोषणांचा पाठपुरावा करावा, जबाबदारी टाळून पळ काढणे योग्य नव्हे, अशी खिल्ली पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या संकेस्थळावरून अरविंद केजरीवाल यांना झोळीवाले म्हणून हिनवले होते. आता अजित पवार यांनी केजरीवाल यांना लक्ष्य केलं. केजरीवाल आता झाडून घेऊन पळतायेत, असं अजित पवार म्हणालेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.