www.24taas.com, झी मीडिया, धुळे, अकोला, नंदुरबार
अकोला, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल आज लागले. यापैकी अकोल्यात त्रिशंकू अवस्था असून प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघानं सर्वाधिक २२ जागा जिंकल्यात.
तर भाजपनं जिल्ह्यात मुसंडी मारत चार जागांवरून १२ जागांवर झेप घेतलीय. या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सफाया झालाय. या निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवार आणि जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा इंगळेंना पराभव सहन करावा लागलाय.
अकोलाकरांनी कोणत्याच पक्षाला निश्चित कौल दिला नसल्यानं आगामी काळात घोडेबाजार होणार हे निश्चित. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी नवी समिकरणं पाहयला मिळतील
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते विजयकुमार गावितांना धक्का बसलाय. ५५ जागांपैकी काँग्रेसनं २९ जागा जिंकत सत्ता मिळवलीय. तर मागच्या निव़डणुकीत ३२ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला यंदा २५ जागाच मिळवता आल्यात. १ जागी भाजपाचा उमेदवार विजयी झालाय.
तर धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय. मागच्या निवडणुकीत १४ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला यंदा केवळ २ जागाच जिंकता आल्यात. भाजपानं १३ जागी विजय मिळवलाय. तर काँग्रेसनं ५६ पैकी ३० जागा जिंकत सत्ता हस्तगत केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसनं ७ जागी विजय मिळवला असून चार जागी अन्य उमेदवार विजयी झालेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.