www.24taas.com, संतोष लोखंडे, झी मीडिया बुलढाणा
वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं तुम्ही आता पर्यंत धार्मिक ग्रंथातून ऐकलं असेल....पण आजच्या काळातही ते अशक्य नसल्याचं इंदूरच्या श्री सदगुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टने दाखवून दिलंय...वाल्याचा वाल्मिकी झाल्याची अशीच एक कहाणी...
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या श्री सदगुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टच्या आश्रमात पुजेची लगबग सुरु झालीय..आश्रमातील मंदिरात नित्यनियमाने विधीवत पुजा करण्याची जबाबदारी धनंजय जोशींवर आहे...आश्रमात आलेल्य़ा भक्तांच्या पदरी पुजेचं दान पडावं असा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो..
आणि त्यामुळेच इथं येणारे भाविक त्यांच्यासमोर नतमस्तक होतात...पण लोकांना चरणस्पर्श करतांना पाहून धनंजय जोशी यांना आपला भूतकाळ आठवला की उर भरुन येतो...कारण खूनाच्या गुन्ह्यात धनंजय जोशी यांनी १७ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा भोगलीय...
१९९४मध्ये धनंजय जोशी यांना शिक्षा झाली होती..शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर पडल्यानंतर नातेवाईक, समाज आपला स्विकार करणार का ? असा प्रश्न त्यांना पडला होता....पण त्याचवेळी त्यांनी इंदूर येथे जावून भय्यूजी महाराजांची भेट घेतली आणि धनंजय जोशी यांचं आयुष्यच बदलून गेलं...
तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आलेल्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम भय्यूजी महाराजाच्या श्री सदगुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टकडून केलं जातंय...
वाल्याचा वाल्मिकी झाल्याचं रामायणातून तुम्ही ऐकलं असेल...पण आजच्या काळातही ते शक्य असल्याचं श्री सदगुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट सारख्या संस्थानी दाखवून दिलंय..