www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्यास त्यासाठी रहिवाशांना जबाबदार ठरवण्याचा निर्णय नागपूर महापालिकेनं घेतलाय. पालिकेच्या या निर्णयावर नागपूरकरांनी नाराजी व्यक्त केलीय.
तुम्ही नागपुरातील उंच इमारतीत राहत असाल आणि तूमच्या इमारतीच्या बेसमेंट मध्ये जर असं पाणी साचले असेल तर आता पालिका तुमच्यावर कारवाई करू शकते. कारण इमारतींच्या तळ मजल्यात पाणी साचू नये याची काळजी आता तुम्हालाच घ्यायची आहे. पालिकेच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरणार नाही याची काळजी इमारत बांधतानाच घेणे गरजेचे आहे अशी स्पष्ट सूचना नागपूर महानगर पालिकेने दिलीय.
पालिकेच्या या भूमिकेवर नागपूरकरांनी आक्षेप घेतलाय. रस्त्यावरून वाहणारे पाणी इमारतीत शिरले तर त्याची जवाबदारी कोण घेणार असा प्रतिप्रश्न नागरिकांनी केला आहे. इमारतीच्या बांधकामात दोष आढळ्यास ते बांधकाम करणारा बिल्डर तर दोषी आहेच, पण त्या बांधकामाचा नकाशा मंजूर करणारा पालिकेच्या बांधकाम विभागाचा अधिकारीही तितकाच जबाबदार आहे. मग त्या संबंधित अधिकाऱ्यावर देखील पालिका कधी कारवाई करणार हा प्रश्न कायम आहे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.