‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!

पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 5, 2013, 10:10 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, वर्धा/यवतमाळ
पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.
वर्ध्यात पिढ्यानपिढ्या शेती करणारे हरिभाऊ नगराळे हे शेतकरी यंदाचा पोळा नव्या बैलजोडीसह साजरा करण्याचं स्वप्न पाहात होते. मात्र अतिवृष्टीमुळं त्यांचं हे स्वप्न पुराच्या पाण्यात वाहून गेलंय. हाताशी पैसा नाही आणि त्यात वाढती महागाई यामुळं पोळा कसा साजरा करावा या विवंचनेत हरिभाऊ सापडले आहेत.
हीच अवस्था यवतमाळमधल्या शेतकऱ्यांचीही झालीय. गगनाला भिडणार्याम महागाईमुळं बैलाला सजविण्यासाठी लागणार्याा साहित्याच्या किंमतीत ५० टक्क्यांनी वाढ झालीय. पोळा म्हटला की बाजारात पू्र्वी रेलचेल राहयाची. मात्र यंदा बैलजोडी सजावटी लागणारे रंग, कासरे, झुली, बारशिंगी, गोंडे, घुंगरे, वेसनाच्या किमती वाढल्यानं पोळा असूनही बाजारात निरुत्साह आहे.
वर्षभर शेतकरी आपल्या जीवाभावाच्या सहकाऱ्यासह काबाडकष्ट करतो. एक दिवस तरी आपल्या सहकाऱ्याचं कोडकौतुक करावं यासाठी बळीराजा पोळा सणाची वाट पाहत असतो. मात्र यंदा या पोळा सणावर महागाई आणि अतिवृष्टीची संक्रात कोसळलीय, असंच म्हणावं लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.