अभिनेत्री युक्ताच्या ‘मुखी’ पतीची तक्रार

अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड युक्ता मुखी हिने पती विरोधात तक्रार दिलीये. हुंड्यासाठी आपला छळ होत असल्याचा आरोप युक्ता मुखीनं केलाय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 6, 2013, 02:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड युक्ता मुखी हिने पती विरोधात तक्रार दिलीये. हुंड्यासाठी आपला छळ होत असल्याचा आरोप युक्ता मुखीनं केलाय.
मुंबईत आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीये. पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
युक्ताने दोन नोव्हेंबर २००८ रोजी नागपूरचे व्यावसायिक प्रिन्स टुली यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगाही झाला. त्यानंतर दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले.
वाद विकोपाला गेल्यामुळेच युक्ताने आंबोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. याआधीही एकदा युक्ताने नव-याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र त्यावेळी दोघांमध्ये तडजोड झाली होती.

युक्ता मुखी १९९९ मध्ये मिस वर्ल्ड झाली. नंतर युक्ताने सिनेसृष्टीत करिअर सुरू केली. पण तिला अपेक्षित यश मिळाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष यश मिळाले नसूनही युक्ता मुखीने लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले आहेत.
नेमक्या याच मुद्दयावरुन युक्ता मुखी आणि तिच्या नव-यात वाद झाले. टुली यांच्या कुटुंबाची भारतात हॉटेल, मॉल, लॉजिस्टिक्स, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे युक्ताने सिनेइंडस्ट्रीशी असलेले संबंध कमी करावेत, अशी टुली यांची इच्छा होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.