मुंबई : तुम्हाला मोबाईल कंपन्यांकडून अथवा विविध कंपन्यांच्या योजना सांगणारे फोन आले, आणि ते इतर भाषेत बोलत असतील तर आपण त्यांच्याशी मराठी बोलण्याचा आग्रह धरलाय का?
कारण अनेक वेळा असं होतं की, मराठी बोलणारे कॉल सेंटरचे कर्मचारी तुमच्याशी हिंदीत बोलतात, आणि काही कंपन्या देखिल हिंदीत बोलण्याचा अप्रत्यक्षपणे आग्रह धरतात, त्यामुळे मराठी कर्मचारी देखिल आडनावाने व्यक्ती मराठी असला, तरी तो तुमच्याशी हिंदीत अथवा इतर भाषेत बोलत असतो.
साध्या सोप्या मराठीत बोला
यावेळी बंबईया हिंदीत बोलणाऱ्या कॉलसेंटर कर्मचाऱ्याशी बोलतांना आपली दमछाक होते, हे टाळण्यासाठी आपण त्यांना सरळ सांगू शकतो, तुमच्या कॉलसेंटरमध्ये मराठीत बोलणारं कुणी असेल, तर त्याला फोन द्या, मी त्यांच्याशी बोलू शकतो.
यानंतर तो कर्मचारी एकतर मराठीत बोलायला लागतो, अथवा मराठी बोलणारा शोधून आणतो, नाहीच मिळाला तर थोड्या वेळाने फोन करतो असंही सांगण्यात येतं.
मायबोलीच्या संवर्धनाला हातभार लागेल
आपलीच लोकं आपल्याशी इतर भाषेत बोलत असतात, म्हणून जिथं शक्य आहे, तिथे आपण मराठीचा आग्रह धरू शकतो, निदान मोबाईल आणि मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांची तरी ती गरज असते. आलेल्या कॉलला मराठीत बोलण्याचा आग्रह धरण्यात चुकीचं काहीचं नाही. कोणत्याही भाषेला विरोध न करता, आपल्या मायबोलीत बोलण्याचा आग्रह धरला तर काय वाईट. याच्याने निश्चितच आपल्या मातृभाषेचं संवर्धन होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.