मुंबई: एका महिला पत्रकाराला ट्विटरवर गँग रेपची धमकी देण्यात आलीये. मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्या या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेन्द्र कुमार असं या विकृताचं नाव आहे. पटियाला हाऊस कोर्टात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर महिला पत्रकारानं ट्विटरवर फोटो अपलोड केले.
त्यानंतर या व्यक्तीनं पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्यावर सामूहिक बलात्कार होईल, अशी धमकी या महिला पत्रकाराला दिली.
या प्रकरणी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या व्यक्तीला अजून अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.