मुंबई: महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रावसाहेब दानवे यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या पदासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांची नावं चर्चेत आहेत.
दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यात येण्यासाठी पसंती दाखवलीय. आता भाजप प्रदेशाध्यक्षपदी माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
विधानसभा निवडणुकीआधी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.