काय आहे भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’...

आज विधिमंडळात आवाजी मतदानानं भाजपनं विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतलाय पण, विरोधी पक्ष शिवसेना आणि काँग्रेसनं मात्र ही पद्धत लोकशाहीला काळिमा असल्याचं म्हणत मतदान पद्धतीनं बहुमत सिद्ध करण्याचं एक प्रकारे आव्हानंच भाजपला दिलंय. 

Updated: Nov 12, 2014, 04:05 PM IST
काय आहे भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’... title=

मुंबई : आज विधिमंडळात आवाजी मतदानानं भाजपनं विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतलाय पण, विरोधी पक्ष शिवसेना आणि काँग्रेसनं मात्र ही पद्धत लोकशाहीला काळिमा असल्याचं म्हणत मतदान पद्धतीनं बहुमत सिद्ध करण्याचं एक प्रकारे आव्हानंच भाजपला दिलंय. 

हे आव्हान पेलण्यासाठी आणि यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी भाजपमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ आखल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये, इतर पक्षातील नाराज आमदारांना आपल्याकडे वळवून घ्यायचा आणि बहुमत सिद्ध करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. पण, हेही वाटतं तितकं सोप्पं नाही...

सध्या भाजपकडे १२१ जागा आहेत. बहुमतासाठी त्यांच्याकडे १४४ पेक्षा जास्त आमदारांच्या पाठिंब्याची गरज लागेल. शिवसेनेनं विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीनं बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी पवारांचं हेही गणित भाजपला सोडवणं कठिण जाईल... शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेकदा राष्ट्रवादीचा पाठिंबा नको, अशीच भूमिका अनेकदा बोलून दाखवलीय. 

त्यामुळेच, भाजपला आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी इतर पक्षांतील आमदार फोडावे लागतील. अशा फुटीर आमदारांना आपल्या सद्य पक्षाचा राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवावी लागेल... आणि स्वत:च्या बळावर निवडून यावं लागेल... त्यामुळेच पुन्हा निवडून येणारे असेच ‘दमदार’ आमदार भाजपला हेरावे लागणार आहेत.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.