हिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा - काँग्रेस

भाजपमध्ये हिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा, असे सांगून भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. 

Updated: Nov 12, 2014, 04:05 PM IST
हिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा - काँग्रेस title=

मुंबई : भाजपमध्ये हिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा, असे सांगून भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

विश्वासदर्शक ठरावादरम्यान मतविभाजनाची मागणी फेटाळून भाजपनं घटनेची पायमल्ली केल्याचा आरोपही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय. राज्यापालांची उद्या भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय. तसंच भाजपनं पुन्हा बहुमत सिद्ध करावं अशी जोरदार मागणीही काँग्रेसनं केली.

दरम्यान, भाजप सरकारनं आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्यानं शिवसेनेनं तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय. भाजपनं घटनेचा खून पाडला असून, हिंमत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलीय.

भाजपच्या या खेळीविरूद्ध राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. फडणवीस सरकारवर वाजपेयींच्या 13 दिवसांच्या सरकारसारखी पराभवाची पाळी येणार होती, असं दिवाकर रावते म्हणाले.

सरकारनं मतविभाजनाची मागणी फेटाळल्यामुळे प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेलेल्या शिवसेनेनंही संताप व्यक्त केलाय. सरकारच्या सोबत कोण आहे, हे महाराष्ट्राला कळायला हवं, असं शिवसेनेचं म्हणणं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.