मुंबईत भाजीचे दर गगनाला भिडलेत

ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरसरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. 

Updated: Jun 16, 2015, 09:40 AM IST
मुंबईत भाजीचे दर गगनाला भिडलेत title=

मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबईत भाजीपाल्याच्या दरांनी टोक गाठलंय. गेल्या महिन्याभरात घाऊक बाजारात रोजच्या जेवणातल्या भाज्याचें दर सरसरी ४५ टक्क्कयांनी वाढलेत. 

आवक घटल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचं समोर येतंय. मेच्या दुसऱ्या आठवड्यात वाशीच्या घाऊक बाजारात १६०० रुपये क्विंटलनं मिळणारा कांदा आज २२०० रुपयांच्या घरात गेलाय. तर ११०० रुपये क्विंटलनं मिळाणारा फ्लॉवर आज १७०० रुपयांनी मिळतोय. 

वांग्यांचा भाव तब्बल ५४ टक्के वधारला असून कोबीच्या भावातही ४२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय. घाऊक बाजारातली ही स्थिती बघता किरकोळ बाजारातही भाज्यांचे भाव कडाडले आहेत. 

एप्रिल महिन्यात कमी पावसाचा अंदाज वर्तव्याल्यापासूनच भाज्यांचे दर वाढायला सुरूवात झाली होती. बागायती शेतकऱ्यांनी पेरण्या लांबवल्यानं भाज्यांचे भाव पुढचा महिनाभर चढेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.