अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा वारस होणार शनिवारी जाहीर

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला शनिवारी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. दाऊद म्हातारा झाल्याने तो आपला वारस कोण असेल, याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दाऊदच्या पार्टीकडे जगाचे लक्ष लागले आहे.

Updated: Dec 24, 2015, 10:16 PM IST
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा वारस होणार शनिवारी जाहीर title=

मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला शनिवारी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. दाऊद म्हातारा झाल्याने तो आपला वारस कोण असेल, याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दाऊदच्या पार्टीकडे जगाचे लक्ष लागले आहे.

२६ डिसेंबरला दाऊला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. मीडियाच्या सूत्रानुसार डी-कंपनी यानिमित्ताने एक ग्रॅंड पार्टीची तयारी करीत आहे. यावेळी दाऊद आपला उत्तराधिकारी घोषीत करु शकतो. त्यानंतर दाऊद मक्का येथे जाण्याची तयारी असेल.

दाऊदची तब्बेत ठिक नाही. ड्रग्स, सट्टेबाजी, हवाला रॅकेट, हत्यार तस्करी यांच्यामाध्यमातून जवळपास १० अरब डॉलरचे साम्राज्य उभे केलेय. हे साम्राज्य संभाळण्यासाठी दाऊद उत्तराधिकारी नेमू शकतो. याबाबतची घोषणा तो आपल्या वाढदिवशी करण्याची शक्यता आहे.

दाऊदचा भाऊ अनीस अहमद याचे नाव चर्चेत आहे. तो डी कंपनीचा सीईओ असल्याची ओळख आहे. दाऊदचा तो उजवा हात आहे. तर दाऊदचा डावा हात समजला जाणारा छोटा शकीलने आपली पोझिशन बनविली आहे. त्यामुळे अनीस हाच वारस असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, दाऊदच्या पार्टीची घोषणा झालेली नाही. ती कुठे होणार याचीही माहिती नाही. दोन दिवसांपूर्वी बातमी आली की, कराची किंवा दुबईमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्टीला खास ६०० लोक आमंत्रित कऱण्यात आलेत. मात्र, पार्टी कोठे होणार याची माहिती नाही. मात्र, दाऊदच्या पार्टीवर मुंबई पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर विभागाचे लक्ष आहे.