मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आणि भूसंपादन विधेयकावरुन, मित्र पक्ष भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलंय. मुंबईमध्ये एका खासगी कार्यक्रमात त्यांनी या दोन मुद्यांवरुन, भाजपवर निशाणा साधला.
तर अणूऊर्जा प्रकल्पाचं समर्थन करणाऱ्या मंत्र्यांचा, फुकुशिमा आणि चेर्नोबिलला दौरा काढला पाहिजे, असा शालजोडीतला टोलाच उद्धव यांनी यावेळी लगावला.
ज्या महाराष्ट्रात विनोबा भावेंनी भूदान चळवळ उभारली. त्याच महाराष्ट्रातले नेते गोरगरीबांची जमीन घेणार असतील तर शिवसेना त्याला तीव्र विरोध करेल, असा इशारा देत जमीन अधिग्रहण कायद्याला असलेला विरोध त्यांनी पुन्हा बोलून दाखवला.
दरम्यान, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरुन शिवसेना जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय. या प्रकल्पाला खरंच विरोध असेल तर शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी राजीनामा द्यावा असं आव्हान निलेश राणेंनी दिलंय. तसंच सत्तेसाठी उद्धव ठाकरे लाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.