राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थानांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश

राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थान यांना उद्यापर्यंत त्यांच्याकडे जमा झालेल्या जुन्या पाचशे आणि हजार नोटा बॅकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विधी न्याय विभागाने तशा सूचना देवस्थानांना केल्या आहेत.

Updated: Dec 29, 2016, 11:25 AM IST
राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थानांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश  title=

मुंबई : राज्यातील प्रसिद्ध ट्रस्ट देवस्थान संस्थान यांना उद्यापर्यंत त्यांच्याकडे जमा झालेल्या जुन्या पाचशे आणि हजार नोटा बॅकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विधी न्याय विभागाने तशा सूचना देवस्थानांना केल्या आहेत.

सिद्धिविनायक मंदिर, तुळजापूर तुळजाभवानी मंदिर, पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदिर, कोल्हापूर महालक्ष्मी, शिर्डी साईबाबा संस्था, धर्मादाय ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिराना आदेश देण्यात आले आहेत.

यापूर्वी २४ नोव्हेंबरला मंदिरात दानपेटीत पाचशे हजार नोटा स्विकारण्यात येऊ नये तसेच मंदिरात जमा झाल्या तर त्या बँकेत जमा करू नये, अशा आदेश दिेला होता. आता आज आणि उद्या शेवटच्या क्षणला मंदिरांना बँकेत पैसे भरण्याचे आदेश दिले आहेत. सध्या सिद्धिविनायक मंदिरात सुमारे ३५ लाख जुन्या बाद झालेल्या नोटा शिल्लक आहेत.