राज्यात वृक्ष लागवड, मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर

राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याच्या सरकारच्या संकल्पाला आजपासून सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल यांच्यासह  केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि अनेक सेलिब्रिटीं उपस्थितीत आहेत. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित आहे.

Updated: Jul 1, 2016, 11:39 AM IST
राज्यात वृक्ष लागवड, मुख्यमंत्री-उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर title=
संग्रहित

मुंबई : राज्यात दोन कोटी वृक्ष लावण्याच्या सरकारच्या संकल्पाला आजपासून सुरूवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल यांच्यासह  केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि अनेक सेलिब्रिटीं उपस्थितीत आहेत. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित आहे.

वनमंत्र्यांनी स्वतः याविषयीचं निमंत्रणं उद्धव ठाकरेंना दिलं. या अभियानाअंतर्गत पुढच्या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लावण्याचा सरकारचा मनोदय आहे. यंदा दोन कोटी, २०१७ मध्ये ३ कोटी, तर २०१८ मध्ये १० कोटी आणि २०१९मध्ये २५ कोटी वृक्ष लावण्यात येतील, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यासाठी ३ कोटी ११ लाख ६६ हजार ५७ लोकांनी वृक्ष लावणीसाठी वेबसाईटवर नोंद केली आहे. 

६५ हजार ६४४ ठिकाणं  निश्चित करण्यात आली आहेत. तर या अभियानात १४७ वेगवेगळ्या प्रजातिंचे वृक्ष लावण्यात येतील.  वनविभाग, सामाजिक वनीकरण, आणि इतर सरकारी उपक्रम या उपक्रमासाठी ५ कोटी रोपे उपलब्ध करून देतील. रोपं मोफत मिळणार नसली, तरी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सरकारी विभागाना अर्ध्या दरात रोपे मिळतील.