मुंबई : विधानपरिषदेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा आज नारायण राणेंनी केला आहे.
अभिभाषणाच्या चर्चेला शिवसेनेचा एकही सदस्य हजर नसल्याने सरकार अल्पमतात आले आहे. सरकार बहुमतात आहे की नाही , हे सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यपालांचं अभिभाषणच घटनाबाह्य असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. तर विरोधकांनी हाच मुद्दा लावून धरला आहे. अधिवेशनात विरोधकांसह शिवसेनेने भाजपची कोंडी केली आहे. कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात येत आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. यामध्ये शिवसेना आघाडीवर आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिले आहेत.
कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक झाले असले तरी योग्य वेळी निर्णय घेण्याची आणि त्याचा विरोधकांना राजकीय लाभ मिळणार नाही, याची पुरेपूर खबरदारी भाजपकडून घेतली जात आहे.
- अधिवेशनाच्या सुरुवातीला सरकारने विश्वास दर्शक ठराव पास करून घ्यायला हवं होता, याबाबत पुन्हा एकदा विचार करावा - धनंजय मुंडे
- सरकारला बहुमत आहे का नाही हे सिद्ध नाही, त्यामुळे राज्यपालांचे भाषण असंविधानिक आहे - धनंजय मुंडे
- राज्यपाल अभिभाषणाच्या चर्चेला शिवसेनेचा एकही सदस्य उपस्थित नाही
- भाजप पक्ष अल्पमतात- नारायण राणे
- विधानसभेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक
- अधिवेशनात निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी बैठक
- विधानसभा अध्यक्षांनी बोलवली बैठक
- विरोधकांसह शिवसेनेचे गटनेते बैठकीला हजर राहणार
- गेले अनेक दिवस सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांचा माज दिसला
- आता भाजपचे आमदारही माज करू लागलेत
- ब्राह्मण समाजाविषयी मंत्र्यांनी वक्तव्य केले त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही
- ते वक्तव्य करताना विसरले की मुख्यमंत्री त्या समाजाचे आहेत
- राज्याचे मुख्यमंत्री घाबरतात असे त्यांना म्हणायचे आहे का ?
- मुख्यमंत्री त्यांना पदावर कसे ठेवू शकतात?