मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याबाबत सध्या जोरदार चर्चा राज्यातल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण चर्चा म्हणजे केवळ अफवाच असल्याचं आता स्पष्ट झालेय.
झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्य़ा माहितीनुसार मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातून दिल्लीत बोलवण्याचा कुठलाही विचार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. संरक्षण मंत्रीपदाचा मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारमध्ये फेरबदल होणार आहेत. त्यात फडणवीस यांना बालोवले जाईल असा व्होरा बांधण्यात आला होता.
मुख्यमंत्री यांच्या जागी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागू शकते. कारण राज्यात मराठा नेता देण्यावर भाजपचा प्रयत्न असेल, अशी जोरदार चर्चा होती. मध्यतंरी विधानसभेत चंद्रकांत पाटील तुम्ही या राज्याची सूत्रे हाती घ्या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देतो, असे राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे पाटील मुख्यमंत्री होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार नाहीत, ही अफवा असल्याचे सांगितले जात आहे.