ठाकरे + ठाकरे... राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप!

 महाष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना-मनसे एकमेकांच्या संपर्कात

Updated: Sep 26, 2014, 05:52 PM IST
ठाकरे + ठाकरे... राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप! title=

मुंबई : 'राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नाही... आणि कुणी कुणाचा मित्रंही नाही...' ही म्हण आता खरी ठरताना दिसतेय. कारण, भाजपशी दुरावल्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या पहिल्या फळीतील नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.  
  
यामुळेच, महाष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडीची शक्यता वर्तविण्यात येतेय. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना-मनसे एकमेकांच्या संपर्कात असून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ठाकरे + ठाकरे असे नविन समीकरण जुळण्याची शक्यता आहे.

 


सद्य स्थिती

 

मराठी अस्मिता हा शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांचा कळिचा मुद्दा... दोघेही भावांनी आपल्या विकासाच्या संकल्पना जनतेपर्यंत पोहचवलाय.

भाजपनं दिलेल्या दग्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चीड आहे तर मनसेवर भाजपच्या नेत्यांनी याआधी केलेल्या टीकेमुळे मनसेचे कार्यकर्तेही भाजपला धडा शिकवण्यासाठी तयार आहेत. 

यामुळे, बाळासाहेब ठाकरेंच्या मावळ्यांचे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आशा मात्र बळावल्या आहेत. त्यांच्यासमोर आता प्रश्न एव्हढाच आहे की हे बदल निवडणुकीच्या आधीच होणार की निवडणुकीनंतर होणार?

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.