मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेत पहिली बंडखोरी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
श्रीकांत सरमळकर हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत.
विद्यमान आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंतांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यामुळं सरमळकर हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत.
दरम्यान, शिवसेना नगरसेविका डॉ. शोभा राऊळ बंडाच्या पवित्र्यात उभ्या ठाकल्या आहेत... दहिसरमधून शिवसेनेनं आमदार विनोद घोसाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं त्या नाराज आहेत.
आता भाजपच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी केलीय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.