www.24taas.com, मुंबई
सीएसटी हिंसाचाराच्या मुद्यावरुन आता ठाकरे बंधूंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.. उद्धव आणि राज ठाकरे यांनी गृहखातं आणि सरकारवर सडकून टीका केलीय. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही गृहखात्याचा कारभार टफ मंत्र्यांच्या हातात देण्याची मागणी राज्यपालांकडे केलीय.
सीएसटी हिंसाचारानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.. त्यातच याच मुद्यावरुन आता सरकारला कोंडीत पकडलंय ठाकरे बंधूंनी.. उद्धव आणि राज यांनी गृहखात्यावर चांगलंच तोंडसुख घेतलंय.. मतांसाठी दंगलखोरांना पाठिशी घातलं जातं असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय..
तर एजिओप्लास्टी आणि एँजिओग्राफीनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावलेल्या उद्धव यांच्या रडारवरही सरकार आणि गृहखातं होतं.. शिवसेनेकडून घेता तशी आता रझा अकादमीकडूनही नुकसान भरपाई घ्या अशी मागणीही त्यांनी केलीय. राज्यात सरकार आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला..
तर तिकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही याच मुद्यावरुन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय.. राज्याच्या गृह खात्याचा करभार एखाद्या टफ मंत्र्याच्या हाती द्यावा अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केलीय.
एकूणच सीएसटी हिंसाचाराच्या मुद्यावरुन राजकारण चांगलंच तापलंय.. त्यात आता ठाकरे बंधूंनीही निशाणा साधल्यानं सरकार त्याला कसं प्रत्युत्तर देतं हे पाहावं लागेल..