दिवाळीत फराळासोबत मॅगीची चव घेता येणार

यंदा दिवाळीच्या तोंडावर मॅगी प्रेमींसाठी खुशखबर आहे. यंदा फराळासोबत मॅगीची चव घेता येणार आहे.  

Updated: Nov 4, 2015, 09:29 PM IST
दिवाळीत फराळासोबत मॅगीची चव घेता येणार title=

मुंबई : यंदा दिवाळीच्या तोंडावर मॅगी प्रेमींसाठी खुशखबर आहे. यंदा फराळासोबत मॅगीची चव घेता येणार आहे.  

गेले जवळपास चार महिने देशभरातल्या बाजारातून गायब असणारी मॅगी याच महिन्यात पुनरागमन करेल, असे नॅस्लेने स्पष्ट केलेय. मॅगीच्या तीन नव्या प्लँटमधून तयार झालेलं सॅम्पल सुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यात आलाय.

नेस्लेनं २ कोटी पॅकेट्सची साडे तीन हजार टेस्ट केल्यात आणि त्यातूनच मॅगी सुरक्षित असल्याचं पुढे आलंय. मॅगीमध्ये शिश्याचं अतिरिक्त प्रमाण असल्याचं उघड झाल्यावर देशभरात मॅगीवर बंदी घालण्यात आली. 

दरम्यान मुंबई हायकोर्टानं नेस्लेचा युक्तीवाद ग्राह्य मानून ही बंदी उठवली. गुजरात आणि कर्नाटकातही ही बंदी आधीच उठवण्यात आलीय. 

पण मुंबई हायकोर्टाच्या निकालाविरोधात महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालायात जाण्याची तयारी सुरू केलीय. त्यामुळे मॅगी बाजारात येणार असली, तरी महाराष्ट्रातल्या मॅगीच्या चाहत्यांना त्याचा कितपत लाभ होईल याबद्दल साशंकता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.