मुंबई : देशातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प अशी ओळख असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान निर्माण झालं आहे. सुरक्षेतली ही त्रुटी दाखवून दिली आहे स्थानिक भूरट्या चोरांनी.
या प्रकल्प परिसरातून विजेच्या केबलची चोरी करणा-याला तारापूर पोलिसांनी रंगेहात पकडलं. पावसाचं पाणी जाण्यासाठी इथल्या भिंतींमध्ये ठेवण्यात आलेल्या पाईप, गटार तसंच लोखंडी जाळ्यांमधून प्रकल्प क्षेत्रात शिरुन ही चोरी केली जात होती.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची सुरक्षा व्यवस्था कडेकोट असल्याचा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सी आय एस एफ चा दावा यामुळे खोडला गेला आहे. तसंच देशातल्या अतिमहत्त्वाच्या प्रकल्पाबाबत किती दक्षता घेतली जात आहे, याचा भांडाफोडही यामुळे झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.