उर्वरित १० आमदारांचंही निलंबन मागे

विधानसभेतील निलंबित सर्व आमदारांचे निलंबन आता मागे घेण्यात आलंय.

Updated: Apr 7, 2017, 03:14 PM IST
उर्वरित १० आमदारांचंही निलंबन मागे  title=

मुंबई : विधानसभेतील निलंबित सर्व आमदारांचे निलंबन आता मागे घेण्यात आलंय.

अर्थसंकल्पात कर्जमाफीवरून गोंधळ घातल्याप्रकरणी, अर्थसंकल्प जाळल्याप्रकरणी 19 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. या अगोदर मागच्या आठवड्यात नऊ आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं होतं... त्यानंतर आज उर्वरित १० आमदारांचंही निलंबन मागे घेण्यात आलंय.

31 डिसेंबर 2017 पर्यंत या 19 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. निलंबनानंतर विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता.

आज, निलंबन मागे घेण्यात आलेल्या आमदारांमध्ये

- अमर काळे

- भास्कर जाधव

- विजय वडेट्टीवार

- मधुसुदन केंद्र

- हर्षवर्धन सकपाळ

- जयकुमार गोरे

- कुणाल पाटील

- जितेंद्र आव्हाड

- राहुल जगताप

- संग्राम जगताप

या आमदारांचा समावेश आहे.