मुंबई : आयोध्येत येत्या वर्षात राम मंदिर उभारलं जाईल अशी घोषणा सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. विराट हिंदुस्तान संगमच्या वतीनं दादर येथे आयोजीत केलेल्या कार्यक्रमात स्वामींनी ही घोषणा केली आहे.
जुलै-सप्टेंबर पर्यंत मंदिराचा विषय कोर्टात सुरु करुन संपवून टाकू आणि पुढील रामनवमी आयोध्येतील राममंदिरात साजरी करू असं ही ते म्हणालेत. सुब्रमण्यम स्वामींच्या या घोषणेमुळे राममंदिरावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.