विद्यार्थी रविवारच्या सुट्टीला मुकणार

राज्यातील शाळांची सुरूवात १५ जून दरम्यान होत आहे.  याच आठवडय़ात २१ तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय शिक्षण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. यामुळे रविवारच्या पहिल्याच सुट्टीला विद्यार्थी मुकणार आहेत.

Updated: Jun 1, 2015, 11:28 PM IST
विद्यार्थी रविवारच्या सुट्टीला मुकणार title=

मुंबई : राज्यातील शाळांची सुरूवात १५ जून दरम्यान होत आहे.  याच आठवडय़ात २१ तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय शिक्षण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. यामुळे रविवारच्या पहिल्याच सुट्टीला विद्यार्थी मुकणार आहेत.

योगदिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिक्षकांनी रविवार असला तरी या दिवशी शाळा सुरू ठेवून हा कार्यक्रम साजरा करावा, यासाठी बदली सुट्टी वेगळी देण्यात येईल, असे सक्तीचे आदेशही तावडे यांनी शिक्षकांना दिले आहेत.

संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे.  या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये हा दिवस साजरा केला जाणार आहे. हा योग दिवस यशस्वी करुन योगाभ्यासच्या माध्यमातून शिक्षित,सुसंस्कृत आणि स्वस्थ विद्यार्थी निर्माण करु या, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्र्यांनी केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.